इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहांसाठी जागेचा शोध सुरू जागामालकांनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

अकोला, दि. 26 : अकोला जिल्ह्यात इतर मागास व बहुजन कल्याण विभागातर्फे इमाव, विमाप्र व विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी, तसेच विद्यार्थिनींसाठी प्रत्येकी 100 क्षमतेची अशी दोन वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी भाडेतत्वावर इमारतीचा शोध सुरू आहे. इच्छूक जागामालकांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्तांनी केले आहे.

वसतिगृहांसाठी शासकीय जमीन मिळावी म्हणून महसूल विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ती व्यवस्था होईपर्यंत भाडेतत्वावर इमारत मिळवून वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत.  त्यानुसार अंदाजे 10 हजार चौ. फूट जागा उपलब्ध असल्यास जागामालकांनी इमारतीची कागदपत्रे व सोयीसुविधांच्या तपशीलासह सहायक आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

००००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम