पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; 134 उमेदवारांची प्राथमिक निवड




अकोला, दि.12(जिमाका)-  पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास 346 उमेदवारांनी हजेरी लावली व मुलाखत दिली. त्यातील 134 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी  दिली आहे.

  जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि  अकोला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात 1. क्रेडिट अॅक्‍सेस ग्रामिण लि. अकोला. 2. अॅबेल इलेक्‍ट्रो सॉफ्‍ट टेक्‍नोलॉजी प्रा.लि. अकोला 3. सनसाईन इंजिनिअरिंग अकोला.  4. नवकिसान बायोप्‍लान्‍टीक  लि. नागपूर 5. टॅलेनसेतू सर्व्हिस प्रा. लि. पुणे. 6. पिपल ट्री वेंन्‍चर प्रा.लि. पुणे या सहा कंपन्यांनी सहभाग नोंदविला. 216 पदांसाठी ही भरती  प्रक्रिया राबविण्यात आली.  भरती प्रक्रियेसाठी 346 उमेदवारांनी हजेरी लावली. त्यातील 134 उमेदवारांनी प्राथमिक निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा रोजगार स्वयंरोजगार व कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. रोजगार मेळावा दर महिन्याला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित केला जातो. पात्र व  इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो सह स्वखर्चाने उपस्थित रहावे लागते. दरमहा होणाऱ्या रोजगार मेळाव्यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0724-2433849 अथवा भ्रमणध्वनी क्रमांक 9665775778 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ