पीक विमा, कर्जाबाबत अडचणी सोडविण्यासाठी शेतकरी बांधवांसाठी दि. 17 जुलै रोजी मार्गदर्शन कार्यशाळा


अकोला, दि.14(जिमाका)-  प्रधानमंत्री पीक विमा योजना, पीक कर्ज आदींबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि. 17 जुलै) सकाळी 10.30 वाजता प्रशिक्षण कार्यशाळेद्वारे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले जाणार आहे. शेतकरी बांधवांनी या कार्यशाळेला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

            जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 मध्ये एचडीएफसी इर्गो विमा कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत सोयाबीन, मुग, उडीद, तूर, कापूस व ज्वारी इत्यादी पिकांसाठी शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभागी होण्याची प्रती अर्ज केवळ 1 रुपये भरुन पिक विमा पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. तरी पिक विमा भरण्याबाबत मार्गदर्शनासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.  

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ