ग्रा.प.निवडणूक; 14 ग्रामपंचायतीचे अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध


अकोला दि.14(जिमाका)-  राज्य निवडणूक आयोगाने माहे जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नव्याने आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम घोषीत केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायतीचे अंतिम प्रभाग रचना(नमूना अ) संबंधित तहसिल कार्यालय येथे प्रसिद्ध करण्यात आले आहे, अशी माहिती ग्राप/जिप/पंस निवडणूक विभाग उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी शरद जावळे यांनी दिली.

            ग्रामपंचायतीचा तपशील याप्रमाणे :तेल्हारा तालुक्यातील पिंपरखेड, झरीबाजार, बारुखेडा, मुर्तिजापूर तालुक्यातील घुंगशी व गाजीपूर, अकोला तालुक्यातील काटीपाटी, एकलारा, कापशी रोड, मोराडी, बार्शीटाकळी येथील खोपडी, दोनद खुं.,खाबोरा व जाभरुन, पातुर तालुक्यातील कोसगांवा येथील ग्रामपंचायतीचे अंतिम प्रभाग रचना(नमूना अ) संबंधित ठिकाणच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना