ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ


            अकोला,दि.12(जिमाका)-ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्यास अध्यादेश निर्गमित केले आहे. त्याअनुषंगाने राखीव जागांवर निवडून आलेल्या व्यक्तीनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन ग्राप/जिप/पंस निवडणूक विभाग उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी शरद जावळे यांनी केले आहे.

             अध्यादेशात म्हटल्या प्रमाणे : 1 जानेवारी 2021 रोजी किंवा अध्‍यादेशाच्‍या प्रारंभाच्‍या दिनांकापर्यंत घेण्‍यात आलेल्‍या ग्रामपंचायतींच्‍या, जिल्‍हा परिषदांच्‍या व पंचायत समित्‍यांच्‍या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणूका लढविण्‍यासाठी, ज्‍या व्‍यक्‍तीने पडताळणी समितीकडे अर्ज केलेला असेल, आणि राखीव जागेवर निवडून आलेली असेल, परंतु या अध्‍यादेशाच्‍या प्रारंभाच्‍या दिनांकास अर्ज पडताळणी समितीसमोर प्रलंबित असेल अशा व्‍यक्‍तीने अध्‍यादेशाच्‍या प्रारंभाच्‍या दिनांकापासून बारा महिन्‍यांच्‍या मुदतीच्‍या आत वैधता प्रमाणपत्र सादर करावे. मुदतीच्‍या आत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्‍यास व्‍यक्‍तीची निवड रद्द करण्‍यात येईल. तथापि अध्‍यादेशाच्‍या प्रारंभाच्‍या दिनांकापासून बारा महिन्‍यांच्‍या मुदतीतपर्यंत ती व्‍यक्‍ती पात्र राहिल. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सर्वसाधारण किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेले सरपंच, अध्यक्ष, सभापती तसेच सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर करावे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ