प्रधानमंत्री सन्मान योजनेचा 14 वा हप्ताचे वितरण; शेतकरी बांधवानी ऑनलाईन पद्धतीने सहभागी होण्याचे आवाहन

अकोला,दि.26 (जिमाका) : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत  शेतकऱ्यांना 14 वा हप्ताचा लाभ वितरीत होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार दि. 27 रोजी राजस्थान मधील सिकर येथून ऑनलाईन पद्धतीने वितरीत होणार आहे. पात्र लाभार्थ्यांना एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीतील 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईन जमा होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय रसायन आणि खते, आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया उपस्थित राहणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी https://pwevents.ncog.gov.in या लिंकचा वापर करुन उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ