नुकसानीचे पंचनामे व सर्वेक्षणाच्या प्रक्रियेला वेग

 

नुकसानीचे पंचनामे व सर्वेक्षणाच्या प्रक्रियेला वेग

प्राथमिक अंदाजानुसार 1 लाख 42 हजार 752 हे. शेतीचे नुकसान

अकोला, दि. 24 : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत अद्यापपर्यंतच्या सर्वेक्षणात प्राथमिक अंदाजानुसार 1 लाख 42 हजार 752 हे. आर. शेतीक्षेत्राचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पंचनामे व सर्वेक्षणाच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला असून, ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने यंत्रणेला दिले आहेत.

जिल्ह्यात या महिन्यात दि. 13, दि. 19, दि. 22 व दि. 23 जुलै रोजी अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील 52 महसूल मंडळांपैकी 34 मंडळे अतिवृष्टीत बाधित झाली. आपत्तीमुळे तीन व्यक्ती मृत्यू पावल्या. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतर्फे पाच गावांत बचाव कार्य करण्यात आले. एनडीआरएफ, तसेच स्थानिक बचाव पथकाने पुरामुळे अडकलेल्या 30 व्यक्तींना सुरक्षितस्थळी पोहोचविले. 248 कुटुंबाना सानुग्रह मदत देण्यात आली, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे देण्यात आली.  

 

आतापर्यंतच्या सर्वेक्षणात प्राथमिक अंदाजानुसार 1 लाख 37 हजार 678 हे. आर. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले, तसेच 5 हजार 74 हे. आर. शेतजमीन खरडून गेली. अतिवृष्टीत पशुधनातील 15 दुधाळ व 8 लहानमोठी अशी 23 जनावरे दगावली. जिल्ह्यातील 10 रस्ते व 5 पूल अशा 15 पायाभूत सुविधांचे नुकसान झाले.

सर्वेक्षण व पंचनाम्याची प्रक्रिया प्रत्येक नुकसानाची अचूक नोंद घेऊन लवकरात लवकर पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून तालुकास्तरीय यंत्रणांना देण्यात आले आहेत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ