खरीप हंगामातील कापूस, ज्वारी व सोयाबीन पिकांसाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिफारस


            अकोला,दि.12(जिमाका)- जिल्ह्यात पावसाचे आगमन उशीर झाल्याने खरीप हंगामातील पिक पेरणीला उशीर झाला आहे. आपत्कालीन पिक नियोजन डॉ. पंजाबरावर देशमुख कृषी विद्यापीठ यांनी पिक पेरणीसंदर्भात शिफारशी केल्या आहे. शिफारशीनुसार शेतकरी बांधवानी खरीप हंगामात पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिफारशी

कापूस : अमेरिकन तसेच देशीक कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावेत. साधारण: 20 टक्के जादा ‍बियाणे वापरावी,  सुधारीत व संकरीत वाणाच्या बाबतीत दोन  झाडामधील अंतर कमी करावे,  मुग, उडीद, सोयाबीन पिकांवर आंतरपीक म्हणून आंतरभाव करावा. कापूस, ज्वारी:तूर:ज्वारी या त्रिस्तरीय आंतरपीक पद्धतीचा (6:1:2:1) अवलंब करावा.

ज्वारी : संकरीत ज्वारीचा सी. एस.एच.-9 किंवा सी.एस.एच. -14 वाण वापरावा. बियाणाचा दर 20 ते 25 टक्के  वाढून पेरणी करावी.

सोयाबीन : सोयाबीन टी.ए.एम.एस.38, टी.ए.एम.एस.98,31 किंवा जे.एस. 335 या पैकी उपलब्ध वाण वापरावे. सोयाबीनच्या दोन, सहा किंवा नऊ ओळी नंतर म्हणजेच तुरीची एक ओळ पेरावी. मुग, उडीद, तूर नेहमीप्रमाणे पेरणी करावी.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ