पीक विमा व किसान सन्मान योजनेच्या अंमलबजावणीसाठी सप्ताहाला सुरूवात

 कृषी विभागाचा उपक्रम

पीक विमा व किसान सन्मान योजनेच्या अंमलबजावणीसाठी सप्ताहाला सुरूवात  

अकोलादि. 18 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृषी विभागातर्फे गावोगाव पीक विमा सप्ताहाला सुरूवात करण्यात आली आहे.

ही योजना अकोला जिल्ह्यात एचडीएफसी ॲग्रो कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. पीक विमा योजनेच्या जनजागृतीसह पीएम किसान सन्मान योजनेतील प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी कृषी विभागामार्फत गावपातळीवर सप्ताह उपक्रम राबविण्यात येत आहे.  त्यात पीएम किसान सन्मान योजनेत प्रलंबित लाभार्थ्यांचे ई केवायसी पूर्ण करून घेणे व बँक खाते आधार संलग्न करणे आदी कामे करण्यात येतील.

पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी प्रलंबित लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण करणे व बँक खाते आधार क्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधितांनी कृषी सहायकांशी संपर्क करून ते पूर्ण करून घ्यावे व पीक विमा योजनेतही सहभाग घ्यावाअसे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

                                                                           000 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ