संरक्षित शेतीसाठी साहित्‍याचे उत्‍पादन व पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी नोंदणीसाठी 14 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले


अकोला दि.14(जिमाका)- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान तसेच राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत संरक्षित शेती घटकाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. संरक्षित शेती घटकांतर्गत हरितगृह, शेडनेटगृह, प्लास्टिक मल्चिंग, द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर, डाळिंब पिकासाठी ॲन्टी हेल नेट या घटकाचे साहित्य उत्पादन व पुरवठा करणाऱ्या उत्पादक कंपन्याची नोंदणीसाठी दि. 14 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे, अशी माहिती फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणेचे संचालक यांनी दिली.

संरक्षित शेती तंत्रज्ञानास कृषि विभागाच्या विविध योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देऊन प्रोत्साहन दिले जाते. कृषि विभागाच्या योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाचे साहित्य पुरवठा होणे, साहित्याची गॅरंटी, वॉरंटी व दुरुस्ती याबाबत हमी मिळणे, पॉलीफिल्म, टेपनेट, मोनोनेट, इन्सेक्ट नेट, ॲप्रॉन पेपर, प्लास्टिक आच्छादन, जीआय पाईप, द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर व डाळिंब पिकासाठी ॲन्टी हेलनेट कव्हर या साहित्याचे उत्पादन व पुरवठा करणाऱ्या उत्पादक कंपन्यांची नोंदणी प्रक्रिया महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांचे मार्फत राबविण्यात येत आहे. उत्पादक कंपन्यांच्या नोंदणी प्रक्रियेबाबतची अटी, शर्ती व इतर तपशील कृषि विभागाच्या www.mahanhm.in या www.krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. साहित्याचे उत्पादन व पुरवठा करणाऱ्या उत्पादक कंपन्यांनी नोंदणी प्रक्रियेत सहभागी होऊन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ