कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

 

 

जिल्हा विकास आराखड्याबाबत बैठक

   


कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा

-        जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. 27 : शेती क्षेत्राच्या विकासासाठी जिल्ह्यात पीकवैविध्य व कृषी उत्पादकता वाढणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पुढील काळासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करून त्याचा समावेश जिल्हा विकास आराखड्यात करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले. 

जिल्हा विकास आराखड्याबाबत बैठक जिल्हाधिका-यांच्या दालनात झाली, त्यावेळी ते बोलत होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, उपवनसंरक्षक कुमारस्वामी एस.  आर., जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नीलेश निकम, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, जिल्ह्यातील दुग्धोत्पादन येथील गरजेपेक्षा  कमी असून, ते वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा समावेश आराखड्यात करावा. जिल्ह्यातून प्रत्यक्षात होणा-या निर्यातीचा अभ्यास करून निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबीही समाविष्ट कराव्यात. ग्रामीण विकासात महत्वाची भूमिका बजावणा-या सहकारी संस्था, विविध छोट्या संस्था, गटांचे सक्षमीकरण आवश्यक आहे. त्याचाही विचार व्हावा.   

ते पुढे म्हणाले की, वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रात आवश्यक नर्सिंग, पॉलिटेक्निक आदींबाबत विविध कौशल्ये युवकांमध्ये विकसित होण्यासाठी योजना- उपक्रम, तसेच स्थानिक नागरिकांच्या गरजा, जिल्ह्यांची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन विकास आराखडा निर्माण करावा. विकासाच्या शक्यता असलेल्या अनेक क्षेत्रात गुंतवणूकीला चालना मिळू शकेल अशा संकल्पनांचा समावेश करावा.   

सर्व क्षेत्रांचा विचार करून परिपूर्ण आराखडा लवकरात लवकर निर्माण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ