टपाल विभागातर्फे आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा

 

 

टपाल विभागातर्फे आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा

 

अकोला, दि. 13 : टपाल विभागाच्या आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेत 9 ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रवर डाक अधिक्षक रामी रेड्डी यांनी केले आहे.  

ही स्पर्धा दि. 8 मार्चला होईल. शालेय स्तरावरही स्पर्धेचे 7 मार्चला आयोजन केले जाणार आहे.  इंग्रजी किंवा कोणत्याही भारतीय भाषेत पत्र लिहीता येईल. कमाल शब्दमर्यादा ८०० आहे.

 इच्छूक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज २५ फेब्रुवारीपर्यंत प्रवर अधिक्षक विभागीय टपाल कार्यालय, अकोला या कार्यालयास जमा करावे. सर्कल स्तरावर 25 हजार, 10 हजार व 5 हजार रू. आणि प्रमाणपत्र अशी बक्षीसे आहेत. राष्ट्रीय स्तर 50, 25 व 10 हजार रू. अशी पहिली तीन बक्षीसे आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये पत्रलेखनाची आवड निर्माण होण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*