नरनाळा महोत्सवात ‘इन्व्हेस्टर्स मीट’ : पर्यटन क्षेत्रातील संधींबाबत मंथन गुंतवणूकदारांना सहभागी होण्याचे आवाहन
नरनाळा महोत्सवात ‘इन्व्हेस्टर्स
मीट’ : पर्यटन क्षेत्रातील संधींबाबत मंथन
गुंतवणूकदारांना सहभागी
होण्याचे आवाहन
अकोला, दि. 13 : नरनाळा निसर्ग महोत्सवात गुंतवणूकदारांची परिषद
(इन्व्हेस्टर्स मीट) दि. 17 फेब्रुवारी रोजी दु. 2 वा. मेळघाट टायगर रिट्रीट, शहानूर येथे आयोजित करण्यात
आली असून, पर्यटन विकासाच्या शक्यता, संधींबाबत माहिती देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी सहभागी होण्याचे आवाहन
जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासन आणि अकोट
वन्यजीव विभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या सहकार्याने नरनाळा महोत्सवाचे आयोजन
दि. 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. मेळघाटचे वनवैभव व ऐतिहासिक महात्म्य
लाभलेला नरनाळा किल्ला परिसरात पर्यटन विकासाच्या अनेक शक्यता व नानाविध संधी आहेत.
त्याबाबत परिषदेद्वारे माहिती देण्यात येणार आहे. या परिषदेत गुंतवणूकदारांना हेरिटेज
टुरिझम, इको-टुरिझम, साहसी पर्यटन,
हॉस्पिटॅलिटी. पायाभूत सुविधा, पर्यटनस्थळ विकास, व्यवसाय सुलभता, संबंधित योजना याबाबत
जाणून घेता येणार आहे.
तरी अधिकाधिक गुंतवणूकदारांनी या परिषदेत सहभागी
होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना, उपवनसंरक्षक राहूलसिंह टोलिया व जिल्हा प्रशासनातर्फे
करण्यात आले आहे.
संपर्क : 📞 +91 8092343431
✉️
asinhg@linpico.in
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा