गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; अर्ज मागविले

 

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; अर्ज मागविले

अकोला, दि. 9 :समाजकल्याण कार्यालयातर्फे गटई कामगारांना 100 टक्के अनुदान तत्वावर तयार पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना राबवली जाते. त्यासाठी 28 फेब्रुवारीपूर्वी अर्ज मागविण्यात आले आहेत.

अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी व अनुसूचित जातीचा असावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागातील असल्यास 80 हजार व शहरातील असल्यास 1 लाखापेक्षा अधिक असू नये. तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक. वय 18 पेक्षा कमी नसावे. अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा स्थानिक स्वराज्य संस्थेने त्याला भाड्याने, कराराने, खरेदीने वा विनामूल्य मात्र, अधिकृत ताब्यात दिलेली असावी किंवा त्याच्या स्वयंमालकीची असावी. लाभार्थ्यांचा प्राधान्यक्रम- ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार पीडित झालेली अनुसूचित जातीची व्यक्ती, घरात कोणीही कमवत नाही अशा विधवा, परितक्त्या महिला, दिव्यांग व्यक्ती असा असेल.

इच्छूकांनी सहायक आयुक्त समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, पोलीस वसाहतीजवळ, अकोला येथे अर्ज करावेत.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*