शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी नियोजनभवनात संवाद सातत्यपूर्ण संवादासाठी जिल्हा प्रशासनाचा उपक्रम प्रत्येक अडचण सोडवून अनेक योजनांचा लाभ मिळवून देणार जिल्हाधिकारी वर्षा मीना
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी नियोजनभवनात
संवाद
सातत्यपूर्ण संवादासाठी जिल्हा प्रशासनाचा
उपक्रम
प्रत्येक अडचण सोडवून अनेक योजनांचा लाभ
मिळवून देणार
जिल्हाधिकारी वर्षा मीना
अकोला, दि. ११ : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी सातत्यपूर्ण संवाद
ठेवून त्यांची प्रत्येक अडचण जिल्हा संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून सोडविण्यात येईल,
तसेच त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी
वर्षा मीना यांनी आज दिली.
जिल्ह्यातील गत दोन वर्षांतील सुमारे पावणेदोनशे शेतकरी आत्महत्याग्रस्त
कुटुंबांना विविध योजनांची माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा मीना
यांच्या संकल्पनेतून संवाद कार्यक्रमाचे आयोजन नियोजनभवनात करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी
श्रीमती मीना यांनी या कुटुंबांशी थेट संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या व या कुटुंबांच्या
अडचणी तत्काळ सोडवून, त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे निर्देश यंत्रणांना
दिले.
जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, कुटुंबातील व्यक्ती गेल्याची
भरपाई कशातूनही होत नाही. मात्र, अशा कुटुंबांच्या अडचणी सोडवून त्यांना विविध योजनांचा
लाभ देऊन दिलासा देण्याचा हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. कार्यक्रमात उपस्थित सर्व कुटुंबांच्या
अडचणी कार्यक्रमस्थळी उपलब्ध स्वतंत्र कक्षाद्वारे नोंदवून घेण्यात आल्या. या सर्व
अडचणींचे निराकरण पुढील 10 दिवसांत करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
या प्रत्येक कुटुंबांशी जिल्हा प्रशासनाकडून सातत्यपूर्ण संवाद ठेवून
त्यांच्या अर्जावरील कार्यवाहीची माहिती त्यांना वेळोवेळी देण्यात येईल, तसेच त्यांना
योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची
भूमिका विशद केली. तहसीलदार गौरी धायगुडे यांनी संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजना,
ई हक्क प्रणाली, पुरवठा, रोहयो, महसूल, तर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हरीश देशमुख
यांनी कृषी योजनांची माहिती दिली. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गोपाळ वाघमारे यांनी
समाजकल्याण योजना, जिल्हा रेशीम विकास अधिकारी सुनीलदत्त फडके यांनी रेशीम विकास योजनांची
माहिती दिली. पशुसंवर्धन उपायुक्त स्नेहल पाटील, जिल्हा अग्रणी बँकेतर्फे श्री. गोरे,
जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे श्री. मनवर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे रविंद्र
थोरात, आयटीआयतर्फे सु. प्र.कोलते, आरोग्य विभागातर्फे वृषाली बोबडे, श्री. इंगोले
यांनी विविध योजनांची माहिती दिली.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री.
मालठाणे यांनी आभार मानले.
०००



.jpeg)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा