एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात पैलपाड्यात साकारणार मोठी रोपवाटिका
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात
पैलपाड्यात साकारणार मोठी रोपवाटिका
अकोला, दि. 3 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात
महाबीज उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून अकोला- मूर्तिजापूर रस्त्यावरील पैलपाडा
येथे 2 हेक्टर परिसरात मोठी रोपवाटिका साकारणार आहे.
जिल्हा अभियान समितीची बैठक जिल्हाधिकारी वर्षा
मीना यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी महाबीज उत्कृष्टता
केंद्राच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. जिल्हा अधिक्षक कृषी
अधिकारी हरिश देशमुख, ‘आत्मा’चे संचालक डॉ. मुरली इंगळे, उपविभागीय अधिकारी विवेक
बि-हाडे, तुषार ठाकरे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
या प्रकल्पाचा खर्च 60 लक्ष 19
हजार 242 रू. आहे. प्रकल्पाची 2 लक्ष 9 हजार 500 रोपांची क्षमता आहे. ही रोपवाटिका
उच्च तंत्रज्ञानाधारित असून, 2 हे. इतक्या क्षेत्रात साकारणार आहे.
०००

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा