नरनाळा महोत्सवात रंगणार भव्य कवीसंमेलन

 

नरनाळा महोत्सवात रंगणार भव्य कवीसंमेलन

अकोला, दि. 14 : नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सव उद्यापासून (दि. 15) दि. 17 पर्यंत होणार आहे. महोत्सवात साहसी खेळ, वनपर्यटन, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच मंगळवारी भव्य कवीसंमेलन व मुशाय-याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

पोपटखेड रोड येथील श्री गजानन महाराज विहीर संस्थान परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्यात दि. 17 फेब्रुवारी रोजी स. 10 वा. भव्य कवीसंमेलन व मुशायरा होणार आहे. प्रसिद्ध मराठी कवी गोपाळ मापारी, विठ्ठल कुलट, विजय सोसे, गजानन मते, मंगेश वानखडे त्याचप्रमाणे, हास्य कवी अकिल साहिल, जमीर अहमद जमीर, राहिल रब्बानी अशा मराठी व हिंदी कवींचा संमेलनात समावेश असेल. जळगाव खानदेश येथील प्रसिद्ध कवी साबीर मुस्तफाबादी हे निवेदन करणार आहेत. अधिकाधिक रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन  करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*