शेतकरी आत्महत्या प्रकरणी जिल्हा समितीची बैठक; 10 प्रकरणे मदतीसाठी पात्र
शेतकरी आत्महत्या 10 प्रकरणे मदतीसाठी पात्र
अकोला, दि. 4 : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी
जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेत झाली. त्यानुसार
10 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली.
निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी
हरिश देशमुख, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधी, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रतिनिधी,
पोलीस विभाग प्रतिनिधी यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत 16 प्रकरणे ठेवण्यात आली. त्यावर सर्व बाबी तपासून विचार करण्यात
आला. त्यापैकी 10 प्रकरणे पात्र ठरविण्यात आली. विविध कारणांस्तव अन्य प्रकरणे अपात्र
ठरली. बैठकीत 10 प्रकरणे पात्र ठरल्याने संबंधित शेतकरी कुटुंबांना शासकीय मदत मिळण्याचा
मार्ग मोकळा झाला आहे.
०००
.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा