अकोल्यात शुक्रवारी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
अकोल्यात शुक्रवारी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
अकोला, दि. 4 : नोकरी इच्छूक उमेदवारांना खासगी क्षेत्रातील नोकरीच्या
संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्राने दि. 6 फेब्रुवारी रोजी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले
आहे.
मेळाव्यात 3 नामांकित कंपनीव्दारे एकूण 85 पदांची भरती करण्यात येत
आहे. यामध्ये दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर उमेदवारांना संधी उपलब्ध आहेत. मेळाव्यासाठी
ऑनलाईन अर्ज https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या वेबपोर्टलच्या करावा.
दि. ६ फेब्रुवारीस मुलाखतीसाठी रोजगार मेळाव्यास प्रत्यक्ष सकाळी ११ ते २ या वेळेत
उपस्थित राहावे.
ऑनलाईन सहभागासाठी प्रक्रिया
www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. Employment या टॅबवर
क्लिक करा. Job Seeker हा पर्याय निवडून आपला सेवायोजन नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक
व पासवर्ड वापरुन साईन इन करा. आपल्या होम पेजवरील Job Fair हा पर्याय निवडा.
District मध्ये Akola जिल्हा निवडून Filter बटनवर क्लिक करा नंतर दिनांकीत मेळावा निर्दनास
येईल त्यासमोर असलेल्या Action बटनाच्या खाली View व Apply बटन दिसेल. तद्नतंतर मेळाव्यास
उपस्थित राहणारे उद्योजक व त्यांच्याकडील पदांबाबत माहिती दिसेल. आपल्या पात्रतेनुसार
पदाची निवड करुन Apply बटनवर क्लिक करा. I Agree हा पर्याय निवडा. शेवटी
Successfully Applied for the Job असा मॅसेज दिसेल अशा रितीने आपण ऑनलाईन सहभाग नोंदवू
शकता.
दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते २ या कालावधीमध्ये जास्तीत जास्त
नोकरी इच्छूक उमेदवारांनी आपला बायोडाटा, शैक्षणीक कागदपत्रे, तसेच पासपोर्ट साईज फोटो
व इतर आवश्यक कागदपत्रासह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,
२ रा माळा, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे स्वखर्चाने उपस्थित
राहून संधीचा लाभ घ्यावा. मेळाव्यासंबंधीत अधिक माहिती करिता या कार्यालयाच्या दुरध्वनी
क्रमांक ०७२४ २४३३८४९ किंवा ७०२४२४१०९८ / ९४२१४२५०६६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क
साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक
आयुक्तांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा