ज्ञानज्योती आधार व स्वयंम योजनेला मुदतवाढ

 ज्ञानज्योती आधार व स्वयंम योजनेला मुदतवाढ

अकोला, दि. 9 : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पं. दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजनांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी दि. 15 फेब्रुवारीपूर्वी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालकांनी केले आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या व बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येईल. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना योजनेद्वारे भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता यासाठी रक्कम थेट खात्यात जमा केली जाते.

अर्जदाराचे वय 30 हून कमी असावे. वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रू. च्या असावे. जात प्रमाणपत्र आवश्यक. कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतलेला नसावा. योजनेसाठी अर्ज hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन करावेत. 

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*