जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक एमआयडीसी क्षेत्रातील कामे पूर्णत्वास जाण्यासाठी कार्यक्षम पाठपुरावा करा - जिल्हाधिकारी वर्षा मीना

 





जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक

एमआयडीसी क्षेत्रातील कामे पूर्णत्वास

जाण्यासाठी कार्यक्षम पाठपुरावा करा

-        जिल्हाधिकारी वर्षा मीना

अकोला, दि. 10 : औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र वीज उपकेंद्र, 100 फुटी जोडणी रस्ता, स्वतंत्र जलवाहिनी पूर्णत्वास जाण्यासाठी अधिक कार्यक्षमतेने पाठपुरावा करावा. त्याचप्रमाणे, कामे अपूर्ण ठेवणा-या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी येथे दिले.

जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. महापालिका आयुक्त सुनील लहाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे निकेश गुप्ता, अकोला औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल, लघुउद्योग भारतीचे पंकज बियाणी, आशिष चंदराणा, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र जाधव, केदार पवार, महावितरणच्या अधिक्षक अभियंता प्रतीक्षा शंभरकर, साबांवि कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.  

महान प्रकल्प ते एमआयडीसी जलवाहिनीचे काम लवकर पूर्ण व्हावे. काम अपूर्ण ठेवले जात असेल तर कंत्राटदारावर कारवाई व्हावी. शासनाकडे दिलेल्या प्रस्तावांचा सक्षम पाठपुरावा करावा. सीएफसी सेंटर व उद्योगभवनासाठी विद्युतीकरण आदी आवश्यक मान्यता तत्काळ मिळवून काम पूर्ण करावे.   उद्योजक बांधवांच्या अडचणी दूर करून जिल्ह्यात उद्योगवृद्धीसाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी यावेळी दिले.  

 औद्योगिक परिसरातील अनेक पथदिवे बंद आहेत. त्याची पाहणी करून सर्व पथदिवे सुरू होण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याशिवाय कंत्राटदाराचे देयक अदा करू नये, असेही निर्देश देण्यात आले. नगरविकास विभागाच्या बिल्डींग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीमची माहिती नगररचना सहायक संचालक सादिक अली यांनी दिली. नकाशा मंजुरीची प्रक्रिया सुलभीकरण करण्यासाठी अधिक प्रयत्न होत आहेत, असेही त्यांनी सांगितले. उद्योग केंद्राचे अधिक्षक भगवंत अनवाणे यांनी आभार मानले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*