पीयुसी सेवेसाठी आधारप्रमाणित मोबाईल क्रमांक आवश्यक

 

 

पीयुसी सेवेसाठी आधारप्रमाणित मोबाईल क्रमांक आवश्यक

अकोला, दि. 18 : पीयुसी सेवेसाठी वाहनमालकाचा आधार प्रमाणीकरण केलेला मोबाईल क्रमांक असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

वाहन मालकांचे अद्ययावत संपर्क तपशील वाहन प्रणालीत उपलब्ध नसल्याने पीयुसी, विमा, दंड, कर (ई-चलान) आदी वाहनासंबंधी सूचना वाहनधारकांपर्यंत पोहोचविण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पीयुसी सेवेसाठी वाहनमालकाचा आधार प्रमाणीकरण केलेला मोबाईल क्रमांक उपलब्ध नसेल तर पीयुसी सेवा देण्यात येणार नाही, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन