महोत्सवाचा दुसरा दिवस इंडियन आयडल विनर सलमान अली लाईव्ह कॉन्सर्ट *सुमधुर गाण्यांची बरसात*
महोत्सवाचा दुसरा दिवस
इंडियन आयडल विनर सलमान अली लाईव्ह कॉन्सर्ट
*सुमधुर गाण्यांची बरसात*
नरनाळा महोत्सवात इंडियन आयडल विनर सलमान अली लाईव्ह कॉन्सर्टने एकाहून एक सरस अशा सुमधुर गाण्यांची बरसात केली.
अजय अतुल यांचे ’देवा श्री गणेशा’ हे गाणे गाऊन सलमानने कार्यक्रमाची दमदार सुरुवात केली. त्यानंतर ’मेरे रश्के कमर', ’तेरी दिवानी' बरोबरच चित्रपटांचा संगीतमय प्रवास विशद करणारी जुनी व नव्वदच्या दशकातील अनेक सुंदर गाणी सादर केली.
यावेळी रसिकांमध्ये जाऊन सलमान अलीने गाण्यांमध्ये सर्वांना सहभागी करून घेतले. रसिकांनीही नाचून गाऊन त्याला साथ दिली. सुमधुर सुरावटीने आसमंत निनादून गेले होते. या संगीतमय वातावरणाने तरुणांबरोबरच ज्येष्ठांनाही ठेका धरायला भाग पाडले. या सुरेल बरसातीत सर्व उपस्थित न्हाऊन निघाले.
०००





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा