नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्पा 2; जिल्ह्यात 133 गावांचा समावेश जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत आराखड्याला मान्यता
नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्पा 2; जिल्ह्यात 133 गावांचा
समावेश
जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत आराखड्याला मान्यता
अकोला, दि. 3 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्पा 2 अंतर्गत जिल्ह्यातील
133 गावांचा समावेश असलेल्या आराखड्याला आज जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेतील
जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात
झालेल्या या बैठकीत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हरिश देशमुख, ‘आत्मा’चे संचालक
डॉ. मुरली इंगळे, उपविभागीय अधिकारी विवेक बि-हाडे, तुषार ठाकरे यांच्यासह विविध
अधिकारी उपस्थित होते.
प्रकल्पाद्वारे लहान शेतक-यांची
क्षमता, संसाधनांचा कार्यक्षम वापर, स्पर्धात्मक उत्पादन प्रणालीला चालना देणे, काटेकोर
शेती पद्धतीद्वारे कर्ब उत्सर्जन कमी करणे, हवामान अनुकुल तंत्रज्ञानाचा वापर,
संस्थात्मक बांधणी व नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना मिळणार आहे. या माध्यमातून
वृक्षलागवड, फळबाग लागवड, खतनिर्मिती, सिंचन, बंदिस्त शेळीपालन, रेशीम शेती अशा
अनेक बाबींसाठी शेतक-यांना अर्थसहाय्य मिळणार असून, अधिकाधिक शेतकरी बांधवांना
त्याचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी दिले.
प्रकल्पात वैयक्तिक, सामाईक व शेतकरी उत्पादक कंपनी, महिला
बचत गट, इतर गट स्तरावर अर्थसाह्य दिले जाते. प्रकल्पात अकोला तालुक्यातील 20,
बाळापूरमधील 12, बार्शिटाकळीतील 32, मूर्तिजापूरमधील 13, पातूरमधील 14, अकोटमधील
29, तेल्हारामधील 13 गावांचा समावेश आहे, अशी माहिती एसएओ श्री. देशमुख यांनी
दिली.
०००


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा