जीडीसी अँड ए. व सी.एच.एम.परिक्षा २०२६ ऑनलाईन अर्ज 10 मार्चपर्यंत करता येईल

 

जीडीसी अँड ए. व सी.एच.एम.परिक्षा २०२६

ऑनलाईन अर्ज 10 मार्चपर्यंत करता येईल

अकोला दि. 23 - सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत डिप्लोमा इन को-ऑपरेशन अँड अकाऊंटन्सी (जीडीसी अॅन्ड ए.) व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सीएचएम) परीक्षा मे- २०२६' बाबत अधिसुचना प्रसिध्द करण्यात आली आहे.

परीक्षेतून उत्तीर्णांना नागरी सहकारी बँका, नागरी सहकारी पतसंस्था, कृषि उत्पन बाजार समिती अशा सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांमध्ये पदभरतीसाठी प्राधान्य देण्यात येते. तसेच सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांना सेवानियमातील तरतुदीनुसार सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्यास वेतनवाढ देण्यात येते.

सहकारी संस्थांचे लेखापरीक्षणाकरिता शासनाकडून प्रसिद्ध होणाऱ्या लेखापरीक्षकांचे नामतालिकेवर लेखापरीक्षकांचे नाव समाविष्ट करण्यासाठी सदर परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

सदर परीक्षा दि. २६, २७ व २८ मे रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला यांचेमार्फत घेण्यात येणार आहे. जी. डी. सी. अँण्ड ए. व सी.एच.एम. परिक्षा, २०२६ साठी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. १० मार्च रोजी रात्री ८.०० वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे तसेच बँकेमध्ये चलनाने भरणा करण्याची मुदत दि.१३ मार्च रोजी बँकेच्या कामकाजाच्या वेळेपर्यंत करण्यात आलेली आहे.  

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*