अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

 

 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

अकोला, दि. 5 : आदिवासी विकास विभागातर्फे परदेशातील शैक्षणिक संस्थांत 2026-27 या वर्षात पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी व पीएडी अशा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

परदेशातील संबंधित शैक्षणिक संस्था जागतिक क्रमवारीत 200 च्या आत असावी. उमेदवार व उमेदवाराचे आई,वडील अथवा पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असावे. उमेदवाराच्या पालकांचे,कुटुंबाचे व उमेदवार नोकरी करत असल्यास त्याचे स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गांनी मिळणारे मागील आर्थिक वर्षातील एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.

विहीत निकषांनुसार पात्र विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास उत्पन्न मर्यादा १० लाखापर्यंत, तसेच विद्यापीठाची जागतिक क्रमवारी 300 पर्यंत शिथील केली जाईल. अटी व शर्ती, पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, अनुज्ञेय लाभ, निवड कार्यपद्धती आदी माहिती आदिवासी विभागाच्या https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे आदिवासी विकास आयुक्त लीला बनसोड यांनी स्पष्ट केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*