श्री शिवजयंतीनिमित्त दोन दिवस भव्य सांस्कृतिक कार्यक्रम
श्री शिवजयंतीनिमित्त दोन दिवस भव्य सांस्कृतिक कार्यक्रम
सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनातर्फे आयोजन
अकोला, दि. 17 : सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. 18 व 19 फेब्रुवारी रोजी अकोला येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, पराक्रम व त्यांच्या जीवनातील उदात्त मानवी मूल्यांची नवीन पिढीमध्ये रूजवणूक व्हावी या हेतूने त्यांच्या अतुलनीय शौर्यावर व कर्तृत्वावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
दि. 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भव्य नाट्यप्रयोग होणार असून, दि. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. हे दोन्ही कार्यक्रम जुन्या शहरातील गोडबोले प्लॉटमध्ये शंकरराव खंडेलवाल महाविद्यालयाच्या पद्मानंद सभागृह येथे सायं. 5 ते रा. 9 या वेळेत होणार आहेत. या मंगलप्रसंगी अधिकाधिक अकोलेकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा