‘स्कॉच अवॉर्ड’साठी ई-भूमिती प्रकल्पाचे नामांकन अकोलेकरांनी मत नोंदविण्याचे आवाहन

 

‘स्कॉच अवॉर्ड’साठी ई-भूमिती प्रकल्पाचे नामांकन

अकोलेकरांनी मत नोंदविण्याचे आवाहन

अकोला, दि.  २६ : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ई-भूमिती प्रकल्प या नाविन्यपूर्ण उपक्रमाची प्रतिष्ठित स्कॉच अवॉर्डच्या अंतिम नामांकन यादीसाठी निवड झाली आहे. ही  जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब असून आता या यशाला अधिक उंचीवर नेण्यासाठी आपल्या प्रत्येक मताची गरज आहे. त्यामुळे संबंधित लिंकवर जाऊन मताची नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

हा प्रकल्प नागरिकांना भूमी संदर्भातील सेवा अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आला आहे. डिजिटल प्रशासनाच्या दिशेने अकोला जिल्ह्याने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

आपले एक मत अकोला जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवून देऊ शकते. त्यामुळे

🔗 https://exhibition.skoch.in/beacon-of-hope/collector-officer-akola/

या लिंकवर e-Bhoomiti Project – Collector Office Akola ला आपले अमूल्य मत द्यावे. अकोला जिल्ह्याचा डिजिटल प्रगतीचा ध्वज उंचावणार आहे. मत देताना दिनांक २५ फेब्रुवारी  ते २७ फेब्रुवारी हा पर्याय निवडावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा सूचना  अधिकारी अनिल चिंचोले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ऋषिकेश आग्रे यांनी इ-भूमिती प्रणाली तयार केली आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*