जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सुरक्षित इंटरनेट दिवस’ साजरा इंटरनेटचा विवेकपूर्ण वापर आवश्यक मान्यवरांचे आवाहन




 

 

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सुरक्षित इंटरनेट दिवस’ साजरा

इंटरनेटचा विवेकपूर्ण वापर आवश्यक

मान्यवरांचे आवाहन

अकोला, दि. 10 : ई-महाजालाचा जीवनाची विविध अंगे व्यापून टाकणारा विस्तार व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आजच्या काळात इंटरनेटचा वापर विवेक व सजगता बाळगून करणे आवश्यक आहे, असे आवाहन विविध मान्यवरांनी केले.

 

जिल्हा माहितीविज्ञान कार्यालयातर्फे ‘सुरक्षित इंटरनेट दिवस’ नियोजनभवनात साजरा करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर, निखिल खेमनार, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, अति. जि. मा. विज्ञान अधिकारी श्रीनिधी वाजपेयी, सायबर सेलच्या पोलीस अधिकारी मनीषा तायडे  यांच्यासह अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी सर्वांना इंटरनेट सुरक्षित वापराची शपथ देण्यात आली. डिजीटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्टबाबत श्रीमती वाजपेयी यांनी सविस्तर सादरीकरण केले. सायबर सेलतर्फे आशिष आमले यांनी सजग ऑनलाईन व्यवहार व दक्षतेबाबत माहिती दिली. महाजालातील आपली माहिती सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना व दक्षतेबाबत श्री. चिंचोले यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. ऋषिकेश आग्रे यांनी सूत्रसंचालन केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*