नरनाळा महोत्सव चित्ररथाचा शुभारंभ



 नरनाळा महोत्सव चित्ररथाचा शुभारंभ

 

अकोला, दि. 10 : सातपुड्यात वसलेल्या मेळघाटचे वनवैभव, इतिहास व संस्कृतीचे दर्शन घडविणारा नरनाळा महोत्सव दि. 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान होणार असून, महोत्सवाबाबत जनजागृतीसाठी चित्ररथाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत आज झाला. हा चित्ररथ जिल्ह्यात ठिकठिकाणी पोहोचून महोत्सव उपक्रमाची माहिती पोहोचविण्यात येणार आहे.

अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, उपजिल्हाधिकारी विजय पाटील, महेश परंडेकर, निखील खेमनार, अधिक्षक श्याम धनमने, ऋषिकेश आग्रे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनात नरनाळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, जंगल सफारी, साहसी खेळ व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या समावेश आहे. महोत्सवाच्या प्रत्येक दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ‘चला हवा येऊ द्या’, ‘शिवशंभू गर्जना’, तसेच प्रसिद्ध गायक कैलास खेर यांची ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ असे नामवंत कलावंतांचा समावेश असलेले कार्यक्रम महोत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे. महोत्सवाबाबत चित्ररथाच्या माध्यमातून गावोगाव माहितीचा प्रसार होणार आहे.  

 ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*