अनुसूचित जातीतील युवकांना विनामूल्य डीटीपी प्रशिक्षण
अनुसूचित जातीतील युवकांना विनामूल्य डीटीपी प्रशिक्षण
अकोला, दि. 18 : जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण
संस्था व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे अनुसूचित जातीतील युवकांसाठी एक
महिना कालावधीचे विनामूल्य डीटीपी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात
येणार आहे.
प्रशिक्षण दि.२८ फेब्रुवारी ते ०४ एप्रिलदरम्यान विवेकानंद संगणक केंद्र,
वानखडे नगर, अकोला येथे होईल. अनुसूचित जातीतील युवक- युवती, नवउद्योजकांना उद्योजकता
विकास संबंधी प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचा उद्योग व्यवसाय - स्वयंरोजगार निर्माण
करण्यास प्रवृत्त करणे हा उद्देश आहे.
या अनिवासी स्वरुपाच्या प्रशिक्षण कार्यक्रमामधून सहभागी प्रशिक्षणार्थींना
डी.टी.पी.
चे परिपूर्ण तांत्रिक प्रशिक्षण देऊन यासोबतच उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग
आधार नोंदणी, शासकीय विविध कर्ज योजना-सोयी सवलती आणि कार्यप्रणाली, सिद्धी प्रेरणा
प्रशिक्षण, प्रकल्प अहवाल तयार करणे, उद्योजकांचे अनुभव कथन उद्योगांना प्रत्यक्ष भेटी
इ. विषयी तज्ञ व अधिकारी वर्गामार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे.
पात्रता कमीत कमी ८ वी पास व वयोमर्यादा १८ ते ४५ असावी. जातीचे प्रमाणपत्र
असावे, आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडण्याचा दाखला, गुणपत्रिका, अधिवास प्रमाणपत्र,
छायाचित्र ही कागदपत्रे घेऊन दि. २५ फेब्रुवारीस दु. २ पर्यंत श्रावण खंडारे, महाराष्ट्र
उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, शुक्ल सदन, शर्मा हॉस्पिटल समोर,
दुर्गा चौक, अकोला येथे संपर्क साधावा. दि. २७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता मुलाखती
घेऊन प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात येणार आहे. अधिक माहितीकरिता जिल्हा उद्योग केंद्राचे
प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी व प्रकल्प अधिकारी (बार्टी) विजय बेदरकर यांच्याशी
संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे विभागीय अधिकारी किशोर अंभोरे व
महाव्यवस्थापक संतोष बनसोड यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा