शेतकरी खातेदारांना कर्जासाठी केवायसी करणे आवश्यक
शेतकरी खातेदारांना कर्जासाठी केवायसी करणे आवश्यक
अकोला, दि. 18 : जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमार्फत
व दि. अकोला - वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत घेतलेल्या कर्जांबाबत शेतकऱ्यांनी
केवायसी करणे आवश्यक आहे.
जे शेतकरी मयत झाले असतील त्यांच्या वारसांनी विविध सेवा सहकारी संस्था
व दि. अकोला- वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेत वारसांची नावे देऊन सर्वांनी त्यांचे आधार
कार्ड संबंधीत गटसचिव व बँकेचे शाखाधिकारी यांचेकडे जमा करावेत, असे आवाहन सहकारी संस्थेचे
जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण एच लोखंडे यांनी केले आहे.
अकोला तालुक्यातील 256, अकोटमधील 78, बार्शिटाकळीतील 320, बाळापूरमधील
81, पातुरमधील 133, तेल्हारामधील 253, मुर्तिजापूरमधील 437 असे एकूण 1 हजार 558 खातेदारांचे
आधार कार्ड प्रत सोसायट्यांकडे उपलब्ध नाहीत.
राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून
शेतकऱ्यांची थकीत, कर्जाच्या विळख्यातुन सोडवणूक करण्यासाठी आपत्कालीन व दीर्घकालिन
उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने शेती कर्जाची माहिती पोर्टलवर भरण्याबाबत शासनाचे युध्द
पातळीवर कामकाज सुरु आहे. ही माहिती शासनाने पोर्टलवर भरण्यासाठी सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांचे
केवायसी करणे आवश्यक असल्यामुळे त्यांचे आधार नंबर आवश्यक आहेत. तरी विविध कार्यकारी
सेवा सहकारी सोसायट्या व बँकेकडे बहुतांश शेतकऱ्यांचे आधार कार्ड उपलब्ध नाहीत. त्यामुळे
तत्काळ केवायसी पूर्तता करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी केले
आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा