अकोल्यात 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान जिल्हास्तरीय ‘सरस प्रदर्शन’
अकोल्यात 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान जिल्हास्तरीय ‘सरस प्रदर्शन’
अकोला, दि. 12 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) मार्फत महिला स्वयंसहाय्यता समूहांचे सबलीकरण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांची विक्री वाढविणे तसेच समूहांच्या आर्थिक जीवनमानात वाढ करणे या उद्देशाने जिल्हास्तरीय ‘सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे प्रदर्शन दि. 20 फेब्रुवारी ते दि. 24 फेब्रुवारी 2026 या कालावधीत लाल बहादुर शास्त्री स्टेडियम, सुंदराबाई खंडेलवाल टॉवर चौक, रेल्वे स्टेशन रोड, अकोला येथे भरविण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनासोबतच विभागीय व मिनी सरस प्रदर्शनांचाही समावेश असून या माध्यमातून महिला उद्योजकांना आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळणार आहे, असे आवाहन उमेदचे जिल्हा अभियान संचालक यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा