एस. टी. तर्फे शिकाऊ उमेदवारी भरती

 

एस. टी. तर्फे शिकाऊ उमेदवारी भरती

अकोला, दि. 18 :  एस. टी. महामंडळाच्या एक वर्ष मुदतीसाठी शिकाऊ उमेदवार पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

भरतीत यांत्रिक (मोटारगाडी), शीट मेटल (एमव्हीबीबी), डिझेल मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रिशिअन, वेल्डर, रेफ्रिजेशन व एअर कंडिशन, पेंटर आदी 83 पदे समाविष्ट आहेत.  

त्यासाठी आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी ‘ॲप्रेंटिसशीप इंडिया’ (https: apprenticeshipindia.org) या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. त्यात एमएसआरटीसी अकोला ही आस्थापना निवडावी. ऑनलाईन अर्ज केल्यावर विहीत नमुन्यातील अर्ज दि. 20 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 11 ते 3 या वेळेत विभागीय कार्यालय, मंगरूळपीर रोड, अकोला येथे स्वीकारले जातील.  

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*