निश्चित वेळापत्रकाने रोजगार मेळाव्यांना वाढता प्रतिसाद प्रफुल्ल शेळके यांची माहिती







 

निश्चित वेळापत्रकाने रोजगार मेळाव्यांना वाढता प्रतिसाद

प्रफुल्ल शेळके यांची माहिती

अकोला, दि. 23 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने प्लेसमेंट ड्राईव्हचे निश्चित वेळापत्रक, त्याची व्यापक प्रसिद्धी व विविध उद्योगांशी सतत संपर्क, सुटसुटीत प्रक्रिया केल्याने जिल्ह्यात रोजगार मेळाव्यांना प्रतिसाद वाढत आहे.

अकोला येथील केंद्रातर्फे दर महिन्याच्या तिस-या बुधवारी रोजगार मेळाव्याचे वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निश्चित दिवसाची कल्पना मिळाल्याने त्यांच्याकडून जागांबाबत चौकशी केली जाते, तसेच मेळाव्यात सहभागासाठी आवश्यक तयारी केली जाते. दिवस निश्चित असल्याने हमखास प्रतिसाद मिळतो. त्याचप्रमाणे, वेळापत्रकामुळे सातत्यही राखले जाते. उमेदवार व नियोक्ता दोहोंनाही या उपक्रमाचा लाभ होत आहे, असे जिल्हा कौशल्य विकास अधिकारी प्रफुल्ल शेळके यांनी सांगितले.

पोर्टलवरील नोंदणीबाबतही सुटसुटीत माहिती उपलब्ध करून दिली जाते. केंद्रातर्फे बुधवारी प्लेसमेंट ड्राईव्ह- पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा झाला. त्यात 58 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली. या मेळाव्यात चार नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. एकूण ८३ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. ऑनलाइन २४६ उमेदवारांनी सहभाग नोंदवला. ९६ उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यापैकी ५८ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*