जिल्ह्यात 7 ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे

 

जिल्ह्यात 7 ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे

अकोला, दि. 18 : जिल्ह्यातील 7 गावांत प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी नवीन दर्जेदार प्रशिक्षण संस्थांची निवड प्रक्रिया सुरू आहे.

 

 

हातगाव (मुर्तिजापूर), आलेगाव (पातूर) चोहट्टा, मुंडगाव, (अकोट), हिवरखेड, मालेगाव (तेल्हारा) व वाडेगाव (बाळापूर) या ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्यात येणार आहेत. कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतर कमी व्हावे यासाठी ग्रामीण भागात "प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र" ही योजना राबवली जाते.

पात्र व इच्छूक संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. प्रस्तावाचा विहित नमुना, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत दुसरा माळा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे  उपलब्ध आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*