पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

अकोला, दि. १७ : नोकरी इच्छुक उमेदवारांना खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांच्या वतीने दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी “प्लेसमेंट ड्राईव्ह” अंतर्गत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये चार नामांकित कंपन्यांमार्फत एकूण ८३ पदांची भरती केली जाणार असून दहावी, बारावी, आयटीआय व पदवीधर उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov. in/#/home/index या वेबपोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी पूर्ण केल्यानंतर दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
ऑनलाईन सहभाग नोंदणी प्रक्रिया पुढीलप्रमाणे :
1. www.mahaswayam.gov.in संकेतस्थळाला भेट द्या.
2. एम्प्लॉयमेंट टॅबवर क्लिक करा.
3. जॉब सिकर पर्याय निवडून सेवायोजन नोंदणी क्रमांक/आधार क्रमांक व पासवर्ड वापरून साईन इन करा.
4. होमपेजवरील जॉब फेअर पर्याय निवडा.
5. डिस्ट्रीक्ट मध्ये अकोला निवडून फिल्टर बटनावर क्लिक करा.
6. संबंधित मेळावा निवडून ह्युव व अप्लॉय बटनावर क्लिक करा.
7. पात्रतेनुसार पद निवडून अप्लॉय करा व ॲग्री पर्याय निवडा.
8. सक्सेसफुली ॲप्लाईड फॉर द जॉब असा संदेश दिसल्यावर नोंदणी पूर्ण होईल.
उमेदवारांनी मेळाव्यास उपस्थित राहताना बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो व इतर आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, २रा मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ०७२४-२४३३८४९ किंवा ७०२४२४१०९८ / ९४२१४२५०६६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.
मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा