वाळूघाटांच्या ई-लिलावाला मुदतवाढ

 

 

 

 

वाळूघाटांच्या ई-लिलावाला मुदतवाढ

अकोला, दि. 10 : जिल्ह्यातील 8 वाळूघाटांच्या ई-लिलावाला दहावी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यात अकोला तालुक्यातील कपिलेश्वर, एकलारा, म्हैसांग, उगवा, तसेच बाळापूर तालुक्यातील बहादुरा, सागद, नागद व मांजरी येथील वाळूघाट आहेत.

ई-लिलाव वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला असून त्याबाबतचे शुध्दीपत्रक https://mahatenders.gov.in व https://www.akola.gov.in या संकेतस्थळावर दि. 9 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द करण्यात आले आहे.  

 

इतर 10 घाटांच्या लिलावालाही मुदतवाढ

त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील 10 वाळूघाटांच्या लिलावाला आठवी मुदतवाढ देण्यात आली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील कोळसरा-1, खापरवाडा-2 (खैरी), लोणसणा, बपोरी, पिंगळा दापुरा, बाळापूर तालुक्यातील काजीखेड-2, हिंगणा शिकारी, मोखा, स्वरूपखेड, जानोरीमेळ, तसेच तेल्हारा तालुक्यातील वांगरगाव या ठिकाणांचा समावेश आहे.  

या ई-लिलाव प्रक्रियेत दि. 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वा. पर्यंत ई-निविदा (ई-टेंडर) ऑनलाईन स्वीकारण्यात येतील. दि. 18 फेब्रुवारीस तांत्रिक लिफाफा  उघडण्यात येईल. ई-निविदा तांत्रिक पडताळणीनंतर आर्थिक लिफाफा उघडण्यात येईल. दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता ते दुपारी 1 वाजेपर्यंत ई-ऑक्शन (ई-लिलाव) प्रक्रिया होईल, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी विशाल धांडे यांनी दिली. या लिलावामध्ये जास्तीत जास्त इच्छुक लिलावधारकांनी सहभाग नोंदवावा, असे जिल्हा प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येत आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*