जिल्हास्तरीय लोकशाही दिन 2 मार्च रोजी
जिल्हास्तरीय लोकशाही दिन 2 मार्च रोजी
अकोला, दि. 18 : पुढील महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाहीदिन दि. 2 मार्च
रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी
जिल्हास्तरीय लोकशाही दिन व दिव्यांग लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सामान्य नागरिकांनी तसेच दिव्यांग नागरिकांनी जिल्हास्तरीय
लोकशाही दिनामधील तक्रार अर्ज (तालुका लोकशाही दिनानंतर) विहीत नमुन्यात लोकशाहीदिनाच्या
१५ दिवस आधी दोन प्रतीत पाठविणे आवश्यक आहे. तक्रार विहित नमुन्यात व आवश्यक त्या कागदपत्रांसह
पाठवावी, असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा