श्री गुरु तेग बहादुर यांचे ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्ष नवी मुंबई येथे भव्य कार्यक्रम

  

श्री गुरु तेग बहादुर यांचे ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्ष

 नवी मुंबई येथे भव्य कार्यक्रम

अकोला, दि. १३ :  हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर सहिब जी यांच्या 350 वी शहिदी समागम शताब्दी महोत्सवानिमित्त नवी मुंबई येथील खारघर येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी आयोजिण्यात आला आहे.  त्यानिमित्त शासनातर्फे विविध जिल्ह्यात अनेक उपक्रम घेण्यात येत असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रामध्ये यापूर्वी नागपूर व नांदेड येथे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रम पार पडले असून, आता खारघर येथे होणारा हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरणार आहे.

 श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त गौरवशाली इतिहास सर्वाना माहित व्हावा, त्यांचे अतुलनीय शौर्य, कार्य व  बलिदान यांचे स्मरण होण्याकरिता महोत्सव घेण्यात येत आहे. 

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान हे धार्मिक स्वातंत्र्य, मानवता व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त होणारा हा हिंद-दी-चादर कार्यक्रम समाजात बंधुभाव, एकात्मता आणि सेवा भावनेचा जागर निर्माण करणारा ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे.

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*