‘जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवा’चा जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ








 ‘जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवा’चा

जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ

अकोला,दि. 27: ‘जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवा’च्या शुभारंभ जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते आज वसंत देसाई क्रीडांगण येथे झाला.

विविध स्पर्धा व उपक्रमातील सहभागाने कलागुणांना झळाळी मिळते आणि व्यक्तिमत्व विकासात त्याने मोलाची मदत होते. मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व  त्यांच्यात सांघिक भावना निर्माण होण्यासाठी महोत्सव उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी यावेळी व्यक्त केला.

 

बाल हक्क संरक्षण आयोगाचे माजी सदस्य ॲड. संजय सेंगर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, ठाणेदार मनोज केदारे, शिरीष खंडारे, बालकल्याण समिती सदस्य ॲड. अनिता गुरव, सारिका घिरणीकर, ॲड, शीला तोष्णीवाल, राजेश देशमुख, प्रांजली जैस्वाल, राजू लाडुलकर, संजय मोटे आदी उपस्थित होते.  

बालमहोत्सवातून व्यक्तिमत्व विकासात मोलाची मदत होत असते. हा महोत्सव एक उत्तम संधी समजून यात सहभागी विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी करावी अशा सदिच्छा जिल्हाधिका-यांनी यावेळी व्यक्त केल्या. 

गायत्री, सूर्योदय, शासकीय बालगृहाबरोबरच 4 शाळांच्या 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी महोत्सवात सहभागी झाले आहेत. हा महोत्सव दि. 29 जानेवारीपर्यंत चालणार असून, क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धांबरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 ०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*