नरनाळा महोत्सव 2026 ऑनलाइन सफारीसाठी नोंदणी सुरू

 नरनाळा महोत्सव 2026

ऑनलाइन सफारीसाठी नोंदणी सुरू
अकोला, दि. 27 : मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोट वन्यजीव विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधी दरम्यान 'नरनाळा महोत्सव-2026'चे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाचा उद्देश वने व वन्यजीवांबद्दल जनजागृती प्रचार व प्रसार करणे, वन्यजीवांविषयी आपुलकी निर्माण करणे व स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. सदर महोत्सवा दरम्यान निसर्ग निर्वाचन संकुल, शहानुर येथे जंगल सफारी, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग,रॅपलिंग, बोटिंग व झॉर्बिंग वॉटर बॉलचे आयोजन पोपटखेड धरण येथे करण्यात आलेले आहे. सर्व साहसी क्रीडा हया राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) यांच्या मार्गदर्शक सुचने प्रमाणेच सुरू ठेवण्यात येतील. जंगल सफारीची नोंदणी https://safaribooking.mahaforest.gov.in/Resort.../index/ या संकेतस्थळावर करावी.
विविध स्पर्धांची नोंदणी येथे करा
मॅरेथॉन, सायक्लाथॉन, चित्रकला स्पर्धा, पाककला स्पर्धा, वन्यजीव छायाचित्र स्पर्धा, महोत्सवाची व्हिडीओ रिल्स स्पर्धा, नृत्य स्पर्धांत विनामूल्य सहभागी होता येणार असून विजेत्यांना पारितोषिक देण्यात येईल. या आयोजनाबद्दल माहिती https://narnalafest.in/ या पोर्टलवर प्रकाशीत करण्यात आलेली आहे. या संकेतस्थळावर स्पर्धकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच नरनाळा महोत्सव -2026 च्या अनुषंगाने सुचना, मार्गदर्शन, सहाय्य, स्पर्धांचे नोंदणी करीता वन्यजीव अकोट येथे व जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे सहाय्यता कक्षाची (Help Desk) स्थापन करण्यात आलेले आहेत. स्वयंसेवी संस्था व ईतर यांना महोत्सवामध्ये सहकार्य करीता नोंदणी, स्टॉल लावणे करीता नोंदणी तसेच रहीवासा करीता टेंन्ट व्यवस्था पुरविणे बाबत वरील नमुद मदत डेस्क वर दिनांक 28/01/2026 रोजी सायंकंळी 5.00 वा. पर्यंत नोंदणी करावी. शहानुर व्यतिरिक्त वनविभागाचे जवळ निवासाकरीता व जंगल सफारी करीता अंबाबरवा अभयारण्य, वसाली गेट येथे वरील नमुद संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नरनाळा महोत्सव -2026 च्या अनुषंगाने दिनांक 30 जानेवारी 2026 ते 01 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सर्व सांस्कृतीक कार्यक्रम हे श्री संत गजानन महाराज विहीरी फाटा जवळ, पोपटखेड रोड ता. अकोट जिल्हा. अकोला येथे आयोजीत करण्यात आले असुन, इतर स्पर्धात्मक कार्यक्रमांची तपशिलवार माहिती https://narnalafest.in/ या पोर्टलवर देण्यात आलेली आहे. पोर्टलबाबत माहिती संदर्भात ई-मेल admin@narnalafest.in भ्र.क्र. 7840935372 या क्रमांकावर संपर्क साधावा.
महोत्सवामध्ये जास्तीत जास्त लोकांनी भाग घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना, उपवनसंरक्षक अकोट वन्यजीव विभाग व जिल्हा प्रशासनाने केले आहे.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*