अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
व्याज परतावा कागदपत्रे देण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत
अकोला, दि. 8 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे व्याज परताव्यासाठी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
ज्या लाभार्थ्यांचे पात्रता प्रमाणपत्र 1 जानेवारी 2025 पूर्वी निर्माण केले आहे किंवा ज्या लाभार्थी यांना बँकेकडून बँक कर्ज मंजुरी प्राप्त झाले आहे परंतू व्याज परताव्यासाठी महामंडळाच्या पोर्टल ववर उर्वरित कागदपत्रे घेऊन मंजूरी पत्र अपलोड करण्याची विशेष मुभा देण्यात येत आहे.
तथापि, सदर सुविधा ही तात्पुरत्या स्वरूपाची असून सबब दि. 15 जानेवारीपूर्वी बँक मंजूरीसह सर्व योग्य कागदपत्रे व लाभार्थी यांना तात्काळ अपलोड करण्याबाबत असे जिल्हा समन्वयक, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा