सैन्याधिका-यांच्या पूर्वप्रशिक्षणासाठी अकोल्यात 13 जानेवारीला मुलाखती

  

सैन्याधिका-यांच्या पूर्वप्रशिक्षणासाठी

अकोल्यात 13 जानेवारीला मुलाखती

अकोला, दि.  5 : सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी सेवा निवड मंडळाच्या (एसएसबी) परीक्षेची तयारी नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्राकडून करून घेतली जाते. नवे प्रशिक्षण सत्र लवकरच सुरू होत असून, इच्छूकांनी अकोला येथे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 13 जानेवारीला सकाळी 10 वा. उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाथरकर यांनी केले आहे.

 

नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात 19 जानेवारी ते 3 एप्रिल या कालावधीत प्रशिक्षण सत्र क्र. 66 होईल. इच्छूक युवक व युवतींनी सैनिक कल्याण विभागाच्या महासैनिक (www.mahasainik.maharashtra.gov.in ) संकेतस्थळावर नोंद करून किंवा 9756073306 वर संबंधित प्रवेशपत्र व परिशिष्टांची चेकलिस्ट यांचे अवलोकन करून त्याची प्रत भरून मुलाखतीला येताना सोबत आणावी.

उमेदवार कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षा किंवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी परीक्षा उत्तीर्ण व एसएसबी मुलाखतीस पात्र झालेला असावा किंवा एनसीसीचे सी प्रमाणपत्र ए किंवा बी ग्रेडमध्ये उत्तीर्ण, तसेच एनसीसी गट मुख्यालयाने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी किंवा टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीचे कॉललेटर असावे किंवा युनिव्हर्सिटी प्रवेश योजनेसाठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड यांच्या  training.pctcnashik@gmail.com किंवा

दूरध्वनी क्र. 253-2451032 किंवा व्हाटसअप क्र. 9156073306 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

०००   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा