निवडणूक यंत्रणेमध्ये अद्ययावत व सकारात्मक बदल अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड





















 निवडणूक यंत्रणेमध्ये अद्ययावत व सकारात्मक बदल

अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड

अकोला, दि २५: भारत निवडणूक आयोगाने नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून निवडणूक यंत्रणेमध्ये अद्ययावत आणि सकारात्मक बदल केले आहेत. मतदार नोंदणीसह विविध सुविधा एका क्लिकवर उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे ’माझा भारत माझे मत’ हे ब्रीद सार्थ ठरत आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी आज इथे केले.
ते राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) निखिल खेमनार,अकोला तहसीलदार कुणाल झाल्टे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मतदानाबाबत शपथ घेण्यात आली.
श्री.गायकवाड म्हणाले की,मतदार नोंदणी, नावात दुरुस्ती,पत्ता बदल, मतदार ओळखपत्राची स्थिती तपासणे यांसारख्या सेवा आता ऑनलाइन उपलब्ध असल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.यामुळे पारदर्शकता वाढली असून निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.



श्री. परंडेकर म्हणाले की,लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने मतदाराला थेट मतदान केंद्रास्तरिय अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी " बुक अ कॉल विथ बीएलओ" यासह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

कार्यक्रमात विविध शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.राष्ट्रीय मतदार दिन जनजागृती बाबत विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. पथनाट्य  सादर केले.यावेळी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.मतदान जनजागृती रांगोळी, वक्तृत्व,स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तर नवमतदाराना प्रातिनिधिक स्वरूपात मतदान कार्डचे वितरण करण्यात आले.
00000000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*