माजी सैनिकांना सैनिक कल्याण कार्यालयात नोकरीची संधी
माजी सैनिकांना सैनिक कल्याण कार्यालयात नोकरीची संधी
अकोला दि. 7 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे माजी सैनिकांमधून
काही पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येत आहेत.
येथील सैनिकी मुलांचे वसतिगृहात चौकीदाराचे पद माजी सैनिक प्रवर्गातून
भरण्यात येत आहे. हे अशासकीय, तात्पुरत्या स्वरुपाचे व एकत्रित मानधनावर आणि निवासी
आहे. इच्छुकांनी अर्ज सैन्य सेवा पुस्तक, आधारपत्र व २ छायाचित्रे आदी कागदपत्रासह
दि. १५ जानेवारीपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी
दू. क्र. ०७२४- २४३३३७७ वर संपर्क साधावा.
अशासकीय वाहनचालकाची भरती
जिल्ह्यातील महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळातर्फे जिल्हा सैनिक कल्याण
कार्यालयात अशासकीय वाहनचालक हे पद माजी सैनिकांतून भरण्यात येत आहे. ते अशासकीय, तात्पुरत्या
स्वरुपाचे व एकत्रित मानधनाचे पद आहे. इच्छूकांनी अर्ज, सैन्य सेवापुस्तक, आधारपत्र
व २ छायाचित्रे, वाहन परवाना आणि इतर कागदपत्रांसह दि. १५ जानेवारीपर्यंत जिल्हा सैनिक
कल्याण कार्यालयात सादर करावेत.
लिपीकपद भरणार
त्याचप्रमाणे, महामंडळातर्फे
माजी सैनिक, दिवंगत सैनिकांच्या पत्नी आदींमधून अशासकीय लिपिक टंकलेखकाचे पदही भरण्यात
येत आहे. त्यासाठी मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटाला किमान ३० शब्द असल्याचे प्रमाणपत्र,
तसेच महाराष्ट्र शासनाचे एमएससीआयटी प्रमाणपत्र धारण केलेले असावे किंवा मराठी टंकलेखन
येणे अनिवार्य राहील. इच्छुक माजी सैनिक, दिवंगत सैनिकांच्या पत्नी आदींनी आपले अर्ज
सैन्य सेवा पुस्तक, आधारपत्र व २ छायाचित्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दि.
१५ जानेवारीपर्यंत करावेत, असे आवाहन सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद शरद पाथरकर यांनी
केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा