मुख्य सामग्रीवर वगळा

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घ्यावा


 हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी

सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा

- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

 

नांदेडदि. १७ : ‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मोदी मैदाननांदेड येथे भव्य-दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सामाजिक संस्थासंघटना व स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी सकारात्मकतेने पुढाकार घ्यावा व सक्रिय सहभाग नोंदवावाअसे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकरजिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळेकार्यकारी अधिकारी तथा समन्वयक डॉ. जगदीश सकवान,तहसीलदार संजय वारकड यांच्यासह विविध सामाजिक संस्था व संघटनांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.

मोदी मैदानावर कार्यक्रमस्थळी सुमारे ३५० स्टॉल उभारण्यात येणार असून प्रत्येक सामाजिक संघटनेने किमान ५ ते १० स्टॉल उभारून भाविकांना सेवा द्यावीअसे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी केले. हे स्टॉल दोन्ही दिवस सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहतील. प्रत्येक स्टॉलवर संबंधित संघटनेचे बॅनर लावण्यात येणार असून भाविकांसाठी पिण्याचे पाणीप्रसादअल्पोपहारमाहिती व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले.

तसेच २४ जानेवारी रोजी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथून निघणाऱ्या पालखी मिरवणुकीचे स्वागत करून मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन करीत या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार असल्याने सेवा व्यवस्थेसाठी स्वयंसेवकांनी अधिकाधिक योगदान देण्याचे जिल्हाधिकारी श्री.कर्डिले यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी दोन दिवसांत ८ ते १० लाख भाविक नांदेडमध्ये दाखल होण्याची शक्यता असूनत्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांसह सामाजिक संघटनांनी सज्ज राहणे आवश्यक आहेअसे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या बाहेरपार्किंग स्थळीस्टॉलसाठी आवश्यक साहित्य आणण्यासाठी वाहने व संबंधित व्यक्तींना प्रवेश पासेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

हा कार्यक्रम केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐक्यसेवा आणि  प्रेरणा देणारा ऐतिहासिक सोहळा असल्याने जास्तीत जास्त सामाजिक संघटनांनी पुढे येऊन सहभाग घ्यावा व हिंद-दी-चादर शहीदी समागम यशस्वी करण्यासाठी हातभार लावावाअसे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या एकूण नियोजनाची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी उपस्थितांना दिली.

00000

--

प्रेषकः

जिल्हा माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, अकोला

जिल्हाधिकारी कार्यालय आवार, अकोला.

दूरध्वनी-०७२४-२४२०५६७,२४२०९५१

Twitter-@InfoAkola

Facebook Page-@dioakola

Blog- www.dio-akola.blogspot.com

One attachment  •  Scanned by Gmail

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा