कलम 37 (1) (3) लागू

 

 

कलम 37 (1) (3) लागू

अकोला, दि. 13 : आगामी सण व निवडणूक कालावधी लक्षात घेता जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी वर्षा मीना यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश 23 जानेवारी 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहतील. 

 

या कालावधीत मोर्चे, आंदोलने काढण्यास, तसेच पाच किंवा पाचहून जास्त इसमांना एकत्रित येण्यास मनाई आहे. स्फोटके, दाहक पदार्थ वाहून नेण्यास किंवा शस्त्रे बाळगण्यास मनाई आहे. समाजात तेढ निर्माण करणारे कोणतेही कृत्य करण्यासही मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.  

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा