अकोल्यात २१ पासून वैशिष्ट्यपूर्ण कला महोत्सव
अकोला : सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने प्रमिलाताई ओक हॉल, अकोला या ठिकाणी दि. २१आणि २२जानेवारी २०२६ रोजी साय ६:३० वा. सांस्कृतिक कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण कला महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक 21 रोजी सायंकाळी 6:30 वाजता प्रसिद्ध बंजारा नृत्य सादर होणार असून सादरकर्ता कला संघ हा बार्शीटाकळी तालुक्यातील साखरविरा या गावातील ललिता जाधव आणि कलावंत सादर करणार आहेत.
गुरुवार दि. 22 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजता.महाराष्ट्रची लोककला वासुदेव ,गौधळ,भारुड कलापथक खंडीगमत इत्यादी लोककलेचे प्रकार होणार आहेत. सादरकर्ते - शाहिर विशाल ना.राखोंडे व लोककवी सागर राखोंडे संच, साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहु.मंडळ,पातुर व स्व.विनायक राखोंडे प्रतिष्ठान,पातुर या कार्यक्रमात एकूण 15 कलावंत सहभागी होणार आहे.
या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तसेच विभागाचे संचालक विभीषण चवरे यांच्या नियोजनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम निःशुल्क असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण कला महोत्सव हा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून याचा जास्तीत जास्त प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन श्री विभीषण चवरे ,संचालक सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा