मातोश्री पानंद व बळीराजा शेत रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करावी– जिल्हाधिकारी वर्षा मीना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आढावा
अकोला दि २० : ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी मग्रारोहयो योजना महत्त्वाची संधी असून विहित वेळेत गुणवत्ता पूर्ण कामे पूर्ण करावी.शेतकऱ्यांना थेट शेतापर्यंत पोहचण्यासाठी मातोश्री पानंद रस्ते व मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्त्यांची कामे आराखड्यानुसार प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आढावा घेण्यात आला.
यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे,उपजिल्हाधिकारी(रोहयो) विजय पाटील, उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील,जिल्ह्यातील तहसीलदार गटविकास अधिकारी, संबंधित यंत्रणा विभाग प्रमुख आदी उपस्थित होते
ग्रामीण भागातील शेतकरी व मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मनरेगा योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.मजुरांना वेळेत मजुरी कामांची अद्ययावत नोंद,आधार प्रमाणीकरण,इ केवायसी बाबत त्वरित कारवाई करावी.ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करीत योजनांचा लाभ थेट गरजू घटकांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी दिले.
श्रीमती मीना म्हणाल्या की,नरेगाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांच्या आवारभिंती व प्रसाधनगृह बांधकामांची गुणवत्तापूर्ण कामे करावी.तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन तपासणी करावी.ग्रामसभेच्या माध्यमातून महत्वपूर्ण कामानबाबत आराखडे तयार करावे जेणेकरून ग्राम विकासाला अधिक चालना मिळेल.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा